सातारा : साताऱ्यातील दोन तरुणांनी संपूर्ण देशाची मान शरमेने खाली जाईल, असे घृणास्पद कृत्य केले आहे. या दोघांनी थायलंडमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. थायलंड येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी संबंधित पीडित तरुणीने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे. या घटनेचा आणखी तपशील समोर आलेला नाही. मात्र, या घटनेमुळे सातारकरांची मान शरमेने खाली गेली आहे.
नेमकं काय घडलं?
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोनजण अलीकडेच थायलंड फिरण्यासाठी गेले होते. येथील एका बीचवर फिरत असताना त्यांना जर्मन तरुणी दिसली. एकट्या तरुणीला पाहून दोघांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक लैंगिक अत्याचार केला. अत्याचाराची ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर थायलंड पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत दोन्ही नराधमांना अटक केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध घेत मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तातडीने तपासाला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे. साताऱ्यातील दोन जणांनी थायलंडला जाऊन २४ वर्षीय जर्मन तरुणीवर अशाप्रकारे अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नवऱ्याकडून बळजबरीने अनैसर्गिक संबंध अन् सासऱ्याकडून अत्याचार
पतीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले, सासऱ्याने बलात्कार केला आणि सासू आणि नणंदांनी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी बारामती पोलीस शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय विवाहितेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती मनोज विष्णू सांगळे, सासरा विष्णू जालिंदर सांगळे, सासू नंदा विष्णू सांगळे (सर्व रा. त्रिमूर्तिनगर, ता. बारामती, जि. पुणे), नणंद पूजा संदीप वणवे आणि प्रियंका उर्फ स्वाती माधव वणवे (रा. लाकडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.