-->

घरकाम करणाऱ्या तरुणीला डांबून ठेऊन मारहाण

पुणे – घरकाम करणाऱ्या तरुणीला डांबून ठेऊन मारहाण करण्याचा प्रकार वानवडी येथे घडला. याप्रकरणी घरमालकीणी विरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एका 22 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनूसार माणिकचंद मलबार हिल सोसायटी, लुल्लानगर येथे रहाणाऱ्या शिल्पा मेहेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहेर यांनी तरुणीला जानेवारी महिण्यात कामावर ठेवले होते. 

कामावर ठेवल्यापासून संबंधीत तरुणीला एकदाही तीच्या घरी पाठवण्यात आले नाही. तीला धमकावून तीचा मोबाईल लपवून ठेवण्यात आला होता. यामुळे तीच्या घरच्यांनाही ती कोठे काम करते व कोणाकडे रहाते याची खबर नव्हती. महिणा भरल्यानंतरही तीला महिण्याचा पगार देण्यात आला नव्हता. 

तीला अनेकदा लाकडी दांडके व लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यात येत होती. यानंतर तरुणीला जबरदस्तीने डांबून ठेवून आरोपी बाहेरगावी निघुन गेली आहे. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांनी याची खबर दिली. 

यानंतर पोलिसांनी घरी जाऊन तीची सुटका केली. संबंधीत तरुणी ही महाडमध्ये रहाणारी आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.