नगर (प्रतिनिधी) – करोना बाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ आजही कायम आहे. जिल्ह्यात आज पुन्हा 449 नवे पॉझिटिव्ह सापडले असून, आज केवळ 325 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 77 हजार 30 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.77 टक्के इतके झाले आहे. आज वाढलेल्या नव्या रुग्णांमुळे झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 227 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 159, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 267 आणि अँटीजेन चाचणीत 23 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 52, जामखेड 06, कोपरगाव 17, नगर ग्रामीण 08, नेवासा 02, पारनेर 12, पाथर्डी 11, राहुरी 06, संगमनेर 21, शेवगाव 08, श्रीगोंदा 14, श्रीरामपूर 01 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 94, अकोले 05, कोपरगाव 28, नगर ग्रामीण 08, नेवासा 09, पारनेर 10, पाथर्डी 04, राहाता 42, राहुरी 09, संगमनेर 32, शेवगाव 08, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 13 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 23 जण बाधित आढळुन आले. मनपा 10, पारनेर 01, पाथर्डी 01, राहाता 05, शेवगाव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 01, कॅन्टोन्मेंट 01, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 91, अकोले 06, जामखेड 02, कर्जत 02, कोपरगाव 04, नगर ग्रामीण 18, नेवासा 12, पारनेर 13, पाथर्डी 05, राहाता 21, राहुरी 18, संगमनेर 72, शेवगाव 33, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 12, कॅन्टोन्मेंट 06 आणि इतर जिल्हा 08 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या : 77030
उपचार सुरू असलेले रूग्ण : 2227
जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 1172
एकूण रूग्णसंख्या : 80429