कर्नाटक : राज्यातील हुबळी शहरात एक भयानक घटना घडली असल्याचे चित्र समोर आले आहे. हुबळी येथील ‘विश्वनाथ मंदिरा’मध्ये देवाची पूजा करताना एका महिलेच्या साडीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
देवाची पूजा करताना महिलेच्या साडीला आग लागली आणि काही वेळातच ही आग वाढत गेली असून, या आगेत महिला गंभीर जखमी झाली. मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही मध्ये ही संपूर्ण घटना रेकोर्ड झाली असून, सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हाराल देखील झाला आहे.
दरम्यान, आगेत जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी जवळील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या महिलेची परिस्थिती गंभीर आहे.