रेल्वेत उभारले कोरोनाबाधितांसाठी सुसज्ज रुग्णालय; एकदा पाहाच

नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतपरीने प्रयत्न करण्यात येत आहे.  देशातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी आणि जर भविष्यात करोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. ते पाहाता मोदी सरकारनं रेल्वेतच विविध मेडिकल सुविधांची तयारी केली आहे.

असा आहे रेल्वेतील आयसोलेशन वार्ड

उत्तर रेल्वेअंतर्गत जगाधारी वर्कशॉपमध्ये २८ डब्ब्यांत आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आले आहेत. गरज पडल्यास असेच तीन लाख आयसोलेशन वार्ड बनविण्यात येतील, असेही रेल्वेने सांगितले आहे.

माहितीनुसार, २८ नॉनएसी कोचला आयसोलेशन वार्ड बनविण्यात आले आहे. जगाधारी वर्कशॉपमध्ये ५ आणि एएमव्ही (AMV)मध्ये पाच डब्ब्यांना आयसोलेशन वार्डमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.

दोन्ही वर्कशॉपमध्ये प्रोटोटाइप वार्ड अंतिम टप्प्यात आहेत. १० दिवसांच्या आत म्हणजेच ६ एप्रिलपर्यंत आयसोलेशन वार्ड बनून तयार होतील.

प्रत्येक डब्ब्यांच्या शेवटच्या पार्टीशियनला काढून टाकण्यात येईल. तसेच प्रत्येक डब्ब्याच्या शेवटच्या शौचालयाला बाथरूममध्ये रूपांतरित करण्यात येईल. यामध्ये साबण, बादली आणि पाण्याचा मग ठेवण्यात आला आहे.

नॉन एसी कोचमधील तिसर्‍या सीटवर चढण्यासाठीच्या पायर्‍यादेखील काढण्यात आल्या आहेत. वैद्यकीय उपकरणे ठेवण्यासाठीची सोयही करण्यात आली आहे.

 

रेल्वे डब्यातील चार्जिंग स्लॉटदेखील व्यवस्थित कण्यात येत आहेत. तसेच प्लास्टिकचे पडदेदेखील लावण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.