अनेक आजारांवर गुणकारी ओवा

ओवा हा प्रत्येक घरात असतोच. ओव्याची चव थोडी वेगळी असली तरी किंचितश्या ओव्याच्या वापराने जेवणाची चव वाढते. मग ती भजी किंवा चकली असो किंवा पुऱ्या, पराठा, खाकरा असो. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाक घरात ओवा असतोच. पूर्वी स्वयंपाक घरातच नाही तर आजीबाईच्या बटव्यात देखील ओव्याला विशेष स्थान होतं …

चला तर मग जाणून घेवूया गुणकारी ओवाचा वापर

ओवा  स्क्रब
ओव्याचे पाणी म्हणजे ओमा हे त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत फायद्याचे मानले जाते. चेहऱ्यावरील मुरुमं व डाग घालवण्यासाठी याची मदत होते. मुळात दररोज ओव्याचे सेवन केल्यास पांचन प्रक्रिया सुकर होते परिणामी शरीरात शुद्ध रक्ताची मात्रा वाढते त्यामुळे एकंदरीतच त्वचेला देखील फायदा होत असल्याचे अनेक गृहिणी सांगतात. अतिउन्हाच्या दिवसात चेहरा सुकल्यावर किंवा लाल झाल्यावर ओवा किंवा ओव्याचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या आद्रतेची पातळी टिकून राहते.

पोट दुखणे किंवा फुगणे
जर सतत पोट दुखणे किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल तर अर्धा चमचा ओवा + चिमुटभर सैंधव रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्येतल्यास अपचन, शौचास साफ न होणे, पोटदुखी अशा अनेक तक्रारी दूर होतात.

ओवा अर्क
लहान मुलांच्या पोटदुखीवर फायदेशीलहान मुलांना सतत पोटदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे त्यांना कोमट पाण्याबरोबर ‘ओवा अर्क’ द्यावा. तसेच बेंबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकल्यास लगेच पोटदुखी थांबते. तसेच जंताचा त्रासही कमी होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.