वाळूमध्ये नष्ट होत चाललंय एक गाव…

काही लोकांनी मात्र हा भुताटकीचा प्रकार मानला आहे

दुबई : संयुक्त अरब अमिराती या देशातील एक गाव वाळूमध्ये हळूहळू नष्ट होत चालले आहे. ‘अल मदाम’  असे या गावाचे नाव असून या गावांमधील सर्वच घरामध्ये वाळूने घर केले आहे वाळवंटात वसलेल्या या गावांमध्ये अशी परिस्थिती का उद्भवली याबाबत कोणतेही खरे कारण समोर येत नसले तरी काही लोकांनी मात्र हा भुताटकीचा प्रकार मानला आहे.

संयुक्त अरब अमिराती या देशाची राजधानी असलेल्या दुबई पासून फक्त 1 तासाच्या अंतरावर हे गाव वसले असून या गावात सध्या कोणीही राहात नाही. या गावात भुताटकी असल्याची अफवा असल्यानेच लोकांनी प्रथम घर सोडून इतरत्र पलायन केले. त्यानंतरच या गावातील घरे हळूहळू वाळूमध्ये नष्ट होण्यास सुरुवात झाली. अर्थात, त्या गावातील लोकांनी जरी आपल्या गावाला रामराम ठोकला असला तरी जगभरातील पर्यटकांसाठी मात्र हे पर्यटनाचे आकर्षण केंद्र झाले आहे.

दुबईमध्ये येणारा प्रत्येक परदेशी पर्यटक या गावाला आवर्जून भेट देतो. या गावाला भेट दिलेल्या परदेशी पर्यटकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या गावातील नागरिकांनी रातोरात घरे सोडल्यामुळे घरातील फर्निचर आणि इतर वस्तू आहेत तशाच असून त्यावर सर्वत्र वाळू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही घरे संपूर्णपणे वाळवंटात दबली जातील अशीही शक्यता आता व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.