“कमांडो-‘ सीरीजमधील दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमविला होता. या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला होता. आता कमांडो सीरीजमधील तिसरा भाग पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे पहिल्यानंतर लोकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.
“कमांडो-3’मध्ये विद्युत जामवाल आणि अदा शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. अदा शर्माने आज आपल्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती गनसोबत शूटिंगची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर कॉमेटस् दिल्या आहेत.
आदित्य दत्त यांच्या दिग्दर्शनाखाली निर्मित होत असलेल्या या चित्रपटात विद्युत जामवालचे जबदरस्त ऍक्शन पाहण्यास मिळणार आहेत. यात विद्युत आणि अदा यांच्याशिवाय अंगीरा धर आणि गुलशन देवैया आदी कलाकारही झळकणार आहेत.
दरम्यान, “कमांडो-3’ चित्रपट या महिन्याअखेर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या फ्रॅंचाईची यापूर्वीचे दोन चित्रपट 2013 आणि 2017मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. या चित्रपटांत विद्युत जामवाल याने प्रमुख भूमिका साकारली होती.
Who wants a Desi Bodyguard? Register Now!
I’m available till the 29th of November. Then #Commando3 releases and Bhavana Reddy will be very busy ??
This is the Indian martial art – silambam
Been practicing for a while..Remember those bruises on my legs? But ohh so worth it?? pic.twitter.com/i1fpNB5V4X— Adah Sharma (@adah_sharma) November 5, 2019