फलटण – कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करणारा पिकअप टेम्पो फलटण ग्रामीण पोलिसांनी राजाळे ता. फलटण येथे पकडला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाच्या तीन जर्सी गायी व टेम्पो, असा सहा लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास राजाळे-पिंपरद रस्त्यावर राजाळे गावच्या हद्दीत जानुबाई मंदिराजवळ पिकअप (एमएच-42-एम-4164) थांबवून फलटण ग्रामीण पोलिसांनी पाहणी केली. त्यात तीन जर्सी गायी सापडल्या. त्या जप्त करून, पोलिसांनी खाजा अब्बास शेख (वय 25), रफीक मकबुल शेख (वय 22) व सोहेल चॉंद शेख (वय 20, तिघे रा. सरडे ता फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.