बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलने आपल्या दमदार अभिनयामुळे अल्प काळावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. “मशान’ या चित्रपटामधून मुख्य अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात करणारा विक्की कौशल आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर सतत ऍक्टिव असलेला विक्की आपल्या चाहत्यांसाठी रंजक पोस्ट करत त्यांचे मनोरंजन देखील करत असतो.
अलीकडेच विक्की कौशलने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे. जो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. वास्तविक या फोटोच्या माध्यमातून त्याने जगप्रसिद्ध महान कॉमेडियन चार्ली चॅपलिन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
या फोटोत विक्की कौशल हा चार्ली चॅपलिनच्या लूकमध्ये दिसत आहे. या फोटोत त्याची ओळख पटवणे फारच कठीण आहे. विक्कीने हा फोटो शेअर करत पोस्ट केले की, “ग्रेटेटेस्ट आर्टिस्ट.”
दरम्यान, विक्की कौशल आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे देखील चर्चेत आहे. विक्की कौशल हा अभिनेत्री कॅटरिना कैफला डेट करत असल्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
विक्की किंवा कतरिनाने अद्याप त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितले नाही. परंतु असे मानले जात आहे की हे कपल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये आहेत.