कोलकता – प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ अर्थात केके यांचे मागील वर्षी कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. केके यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आजही काही जण या धक्क्यातून स्वत:ला सावरू शकलेले नाहीत. यासाठी केकेच्या चाहत्यांनी त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.
कोलकाता येथील ज्या महाविद्यालयात परफॉर्म करताना केके यांना हृदयविकाराचा झटका आला त्याच गुरुदास महाविद्यालयात केके यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. येथील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. त्यांचा पुतळा या महाविद्यालयात निर्माण करून केके यांना मानवंदना देण्यात आली आहे.
‘याद आयेंगे ये पल’ गाण्यावर परफॉर्म करताना केके यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान, केके यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांच्या गाण्याची तरुण वर्गात प्रचंड क्रेझ आहे.
#WATCH | Kolkata: Late singer KK’s statue installed in Gurudas College in Kolkata, where his last concert was held. (31/05)
KK passed away on 31st May, last year after he suffered a heart attack during a concert at the same college pic.twitter.com/hesWzQxG5X
— ANI (@ANI) May 31, 2023
नेमकं काय घडले होते ?
31 मे 2022 रोजी कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच केके यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे ते त्यांच्या हॉटेल रुममध्ये परतले. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले.