मेक्सिको सिटी – जगातील विविध देशांमध्ये पर्यटनाची अनेक आकर्षण स्थळे असतात मेक्सिकोतील एक बेट मात्र वेगळ्याच कारणाने पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे या बेटावर तब्बल 4000 पेक्षा जास्त खतरनाक बाहुल्या असून या बाहुल्या पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक या बेटाला भेट देत आहेत अतिशय छोट्या आकाराच्या या बेटावरील अनेक घरांवर झाडांवर आणि ठिकठिकाणी बाहुल्या टांगलेल्या दिसतात सर्व बाहुल्यांचे प्रकार विविध असून त्या चित्रविचित्र स्वरूपात टांगल्या असल्याने पर्यटक तिकडे आकर्षित होत आहेत अर्थात या बाहुल्या या ठिकाणी कोणी टांगल्या आहेत याबाबत काही कथाही सांगितल्या जातात मेक्सिकेतील या छोट्या बेटावर 1950 मध्ये डॉन संताना जुलियन नावाचा एक माणूस राहण्यासाठी आला होता तेव्हा त्या बेटावर इतर कोणीही राहत नव्हतं.
एक दिवस त्याला त्या बेटातून वाहणाऱ्या एका झऱ्यामध्ये एका लहान मुलीचा मृतदेह सापडला त्या मृतदेहाशेजारी एक बाहुलीसुद्धा होती ज्युलियनने त्या लहान मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आणि ती बाहुली एका झाडाला टांगून ठेवली काही लोकांनी दिलेला माहितीप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्याला आणखी एक बाहुली सापडली ती बाहुलीसुद्धा त्याने त्या ठिकाणी टांगून ठेवली अशाप्रकारे बाहुल्या टांगून ठेवल्यामुळे त्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल असे ज्युलियनला वाटत होते 2001 मध्ये जुलियनचे निधन होईपर्यंत या बेटावर तब्बल 4000 बाहुल्या ठीकठिकाणी टांगण्यात आल्या होत्या.
याच सुमारास एक चित्रपट निर्मिती संस्था या ठिकाणी चित्रीकरणासाठी आल्यानंतर ही गोष्ट अनेकांना समजली त्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढू लागला एवढेच नाही तर त्यानंतरच्या कालावधीमध्ये या बेटाच्या आसपास असलेल्या आणखीन आठ बेटांमध्ये सुद्धा झाडांवर आणि घरांवर अशाप्रकारे भावल्यात टांगण्याची प्रथा सुरू झाली एवढेच नव्हे तर युनोस्कोने ह्या परिसराला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जाही दिला आहे मेक्सिको सरकारने या बेटावर जाण्यासाठी काही नियम केले असून कोणत्याही पर्यटकाला या ठिकाणी रात्री जाता येत नाही रात्री मुक्कामही करता येत नाही तसेच गाईडचे साह्य घेतल्याशिवाय या परिसराची पाहणी ही करता येत नाही आयलंड ऑफ डॉल्स नावाने हे बेट आता लोकप्रिय झाले आहे.