बॉलीवूडमधील अभिनेत्री कंगना रणावतने आज, 23 मार्च रोजी तिचा 33 वा वाढदिवस साजरा केला. तिने आपला हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. खरं तर, 23 मार्च 1931 रोजी ब्रिटिश सरकारने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिली होती. अशा परिस्थितीत कंगनाने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर करत या तिन्ही शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
या व्हिडिओमध्ये कंगना गुलाबी रंगाच्या साडीमध्ये भारी सोन्याचे दागिने परिधान करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीस तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपले कुटुंबिय, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानले. यानंतर कंगनाचे प्रसिद्ध कवी कैफी आझमी यांचे अब तुम्हारे हवाले वतन साथियों हे गाणे गुनगुनताना दिसत आहे.
दरम्यान, कंगना सध्या हिमाचल प्रदेशच्या मनाली येथे आपल्या कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा करीत आहे. करोना विषाणूमुळे सर्व शूटिंग पुढे ढकलण्यात आल्यामुळे कंगना आधीच मनाली येथे पोहोचली असून तिथेच थांबली आहे. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास कंगनाही पंगा चित्रपटात ऋचा चढ्ढा आणि नीना गुप्तासमवेत झळकली होती. आता ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायॉपिक थलाइवीमध्ये दिसणार आहे.