यवतमधील ‘त्या’ नऊ तरुणांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

कदमवाकवस्ती अपघातातील तरुणांचा दशक्रिया विधी : प्रत्येक वृक्षाला मुलांची नावे

यवत – यवत (ता. दौंड) परिसरातील तरुणांचा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी काळभोरजवळील कदमवाकवस्ती येथे अपघातात शुभम भिसे, विशाल यादव, निखिल वाबळे, अक्षय वाबळे, दत्ता यादव, अक्षय वायकर, सोनू ऊर्फ नुरमहंमद दाया, परवेझ आत्तार, जुबेर मुलाणी या नऊ तरुणांचा मृत्यू झाला होता. आज (दि. 29) यवत येथे पाच तरुणांचा आणि कासुर्डी येथे शुभम भिसे याचा दशक्रिया विधी पार पडला.

नऊ तरुणांच्या स्मरणार्थ माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने यवत येथील बाजार मैदानात नऊ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक झाडाला या नऊ तरुणांच्या नावाची पाटी लावली आहे. यामध्ये पिंपळ, वड, कडू लिंब, चिंच, सिसा, आंबा या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणांचे नियोजन माहिती सेवाभावी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष विनायक दोरगे पाटील आणि यवत ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आले. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी यवत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ घेणार आहेत.

यावेळी सेवाभावी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष विनायक दोरगे पाटील, उद्योगपती विकास ताकवणे, मृत तरुणाचे वडील अशपाक आत्तार, सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतीश दोरगे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुका अध्यक्ष दत्ता डाडर, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, राहुल अवचट, दत्तात्रय दोरगे, अरविंद दोरगे, सुधीर दोरगे, विजय कदम, गणेश महाराज दोरगे, बायजाताई पवार उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)