लोकपाल यंत्रणेकडे वर्षभरात एकूण 1427 तक्रारी

त्यापैकी 1300 तक्रारींचे निराकरण

नवी दिल्ली – देशात अलिकडच्या काळात उभारण्यात आलेल्या लोकपालाच्या यंत्रणेकडे भ्रष्टाचाराची एकूण 1427 प्रकरणे व तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील 1300 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे अशी माहिती एका अधिकृत तपशीलाद्वारे देण्यात आली. भ्रष्टाचार निर्मुलनातील महत्वाचे हत्यार म्हणून या यंत्रणेचा उल्लेख केला जातो.

लोकपाल यंत्रणा स्थापन होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्याच्या कार्याच्या संबंधात माहितीच्या अधिकारात माहिती मागवण्यात आली असता त्यांनी वरील आकडेवारी सादर केली. त्यानुसार 31 मार्च अखेर पर्यंत लोकपालांकडे एकूण 1427 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्यातील 1345 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. लोकपालांकडे तक्रार दाखल करण्यासाठी केंद्र सरकारने एक अधिकृत फॉरम्याट निश्‍चीत केला आहे.

या विहीत नमून्यात दाखल केलेल्या तक्रारींचेच निराकरण या यंत्रणेद्वारे केले जाते. गेल्या मार्च महिन्यात हा विहीत नमूना अधिसूचनेद्वारे निश्‍चीत करण्यात आला आहे. 23 मार्च 2019 रोजी राष्ट्रपतींनी देशात पहिल्या लोकपालांची नियुक्ती केली आहे. सध्या माजी न्यायमुर्ती पिनाकी चंद्र घोष हे लोकपाल म्हणून कार्यरत आहेत. या यंत्रणेवर अन्य आठ सदस्यही कार्यरत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.