सावेडीत चोरट्यांचा धुमाकूळ; तीन शो-रूममध्ये चोरी

नगर – शहरात एकाच रात्रीत तब्ब्ल पाच दुकाणे फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. नगर मनमाड रस्त्यावरील दोन दुकानातून चोरी केली. तर तीन दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न केला. आज सकाळी या चोऱ्या उघडकीस आल्या. एकाच रात्री तब्बल पाच दुकाने एकाच परिसरात फोडल्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली.

याबाबत माहिती अशी कि, नगर मनमाड रस्त्यावरील एमआरएफ टायर, बॅटरी विक्री करणारे दुकान, मराठा सायकल मंदीर अशी तीन दुकाने फोडली. यातील बॅटरीच्या दुकानातून 30 ते 35 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. मराठा सायकल मंदीर येथून 3 हजार 800 रूपयांची रोख रक्‍क्‍कम चोरीस गेली. एमआरएफ टायर दुकान फोडण्यात आले. मात्र दुकानातून काही चोरी झाली नाही. तसंच इतर दोन ठिकाणीही दुकाने फोडण्यात आली. मात्र तिथेही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

चोरीची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह तोफखाणा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी तोफखाणा पोलिस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करणयाची प्रक्रिया सुरू होती. एकाच रात्री तब्बल पाच दुकाने फेडली. त्यातील दोन ठिकाणी चोरी झाल्याच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. गेल्या काही दिवसापासून चोरटे धुमाकूळ घालत आहेत. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागायला तयार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.