शिरूर : शिरूर शहरातील कुंभार आळी येथील एका 50 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील व शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.
रामलिंग रोड येथे एका बँक कर्मचाऱ्याला ही कोरोना ची बाधा झाली असल्याची माहिती ती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
शिरूर शहरातील या महिलेला काही दिवसापूर्वी त्रास होत असल्याने खाजगी डॉक्टर गेली असता त्यांनी त्याला कोरोना तपासणी करायला सांगितली होती त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा काल कोरोना अहवाल पॉझिटिव आला आहे. या महिलेच्या संपर्कात अनेक नागरिक व त्यांचे नातेवाईक यांचे सलून चे दुकान असल्याने शिरूर शहरात घबराट पसरली आहे.
शिरूर शहरात एका दिवसात तिसरा रुग्ण सापडल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली असून आता शिरूर शहराच्या सर्वच भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत ही शिरूर साठी चिंतेची बाब असून नागरिक व्यापारी यांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे. शिरूर नगर परिषदेच्या वतीने या भागांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे असे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
रामलिंग रोड येथे सापडलेला कोरोना बाधित रुग्ण हा रांजणगाव गणपती येथे एका बँकेत नोकरीसाठी जात होता. तेथील एक कर्मचारीही ही कोरोना बाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्याने यांना ही कोरोना ची बाधा झाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.