कार्ला – वेहेरगाव येथील रोहित दळवी यांच्या घरातील चुलीशेजारील आढळलेल्या 10 फुटी अजगरास वन्यजीवरक्षक टीम सदस्यांनी पकडून जीवनदान दिले.
वेहेरगावचे रहिवासी रोहित दळवी यांच्या घरातील चुलीशेजारी भलामोठा अजगर वेटोळे घालून बसलेला पाहिला. घाबरलेल्या स्थितीत त्यांनी सर्पमित्र योगेश बैकर यांच्याशी संपर्क साधून अजगर पकडण्यासाठी बोलावले.
अजगर 10 फूट लांब व वजनदार असल्याने बैकर यांस पकडणे शक्य नसल्याने त्यांनी वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य सोमनाथ चौधरी व स्वप्नील खाणेकर यांना मदतीसाठी विनंती करून वेहेरगाव येथे बोलावून घेतले. सर्पमित्रांनी अजगरास कोणतीही इजा न करता व्यवस्थितरित्या पकडले.
दुसऱ्या दिवशी अजगरास वनखात्यास कळवून वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य सोमनाथ चौधरी, संतोष सोनवणे, गणेश काजळे, पांडुरंग चांदगुडे, स्वप्नील खाणेकर, दिनेश कदम, सचिन वाडेकर, प्रथमेश मुंगेकर, नयन कदम, सूरज शिंदे, जिगर सोलंकी यांनी अजगरास सुखरूप जंगलात सोडून देऊन जीवनदान दिले आहे.