सैफच्या वाढदिवसानिमित्त ‘लाल कप्तान’चा टीजर रिलीज

मुंबई – बाॅलीवूड अभिनेता आणि नवाब सैफ अली खान हा आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफने वाढदिवसानिमित्त बुधवारी रात्री त्याने लंडन येथे मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. वाढदिवसानिमित्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल त्याला फॅन्सकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. त्याबरोबरीने
होत आहेत. सेक्रेड गेम्स’मध्ये ‘सरताज सिंग’ची दमदार भूमिका साकारणाऱ्याबाबत कौतुकही केले जात आहे.

बॉलिवूड अॅक्टर सैफ अली खान त्याच्या आगामी चित्रपटात नागा साधूची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि त्याच्या या चित्रपटाचे नाव आहे ‘लाल कप्तान’. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये ‘सरताज सिंग’ची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या वाट्याला आणखी एक दमदार भूमिका आली असून, प्रेक्षकांमध्येही आतापासूनच त्याविषयीची बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.


‘लाल कप्तान’ चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये सैफ अली खान नागा साधूंच्या रुपात दिसत होता. कपाळी कुंकवाचा टीळा, काजळ लावलेले डोळे असा नागा साधूंचा लुक या  टीजरमध्ये सुद्धा बघायला मिळत आहे. चित्रपटाची कथा सूड आणि विश्वासघातावर आधारित आहे.

पोस्टरसह या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील प्रदर्शित करण्यात आली आहे. नवदीप सिंग दिग्दर्शित हा चित्रपट 6 सप्टेंबर म्हणजे दसऱ्याच्या दिवशी
प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इरॉस इंटरनॅशनल’ आणि आनंद एल.राय सादरकर्ते असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती ‘कलर यल्लो’ या निर्मिती संस्थेकडून करण्यात येत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×