‘भूत’ चित्रपटाचा थरारक अनुभूति देणारा टिझर आउट

मुंबई- बॉलीवूडमध्ये अभिनेता ‘विकी कौशल’ याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. चित्रपटसृष्टीत आता त्याला हमखास यश मिळविणा-या अभिनेत्यांपैकी एक मानले जात आहे. विकीचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट सुपर हिट ठरल्या नंतर आता, तो परत एकदा आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.

नुकतच विकीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘भूत पार्ट वन – द हाँटेड शीप’ चित्रपटाचा फर्स्ट टिझर शेअर केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो आणखी एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट एक भयपट असणार आहे.

दरम्यान, ‘भूत’ चित्रपटाचे अनेक भाग येणार असून, याचा पहिला भाग ‘भूत- द हाँटेड शिप’ 15 नोव्हेंबर 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकी सोबतच अभिनेत्री भूमी पेडणेकर सुध्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

?????

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.