रत्नागिरी : करोनाचा एक संशयित रुग्ण रत्नागिरीत आढळला असून त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र, कोणीही घाबरुन जावू नये. केवळ लक्षणे आढळल्याने खबरदारी म्हणून या रुग्णाला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. करोनाचा संसर्ग झालेला नाही, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेला संशयित रुग्ण हा दिल्ली येथे गेला होता. त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. घशाला सूज आली आहे.
त्यामुळे खबरदारी म्हणून त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आहे असून चाचणीसाठी ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.