जगातील सर्वात मोठ्या विमानाचे यशस्वी उड्डाण

लॉस एंजिलिस – स्ट्रेटोलॉंच या एअरोस्पेस कंपनीकडून निर्मित जगाच्या सर्वात मोठ्या विमानाने स्वतःचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. दुहेरी रचनायुक्त आकार आणि फूटबॉल मैदानाच्या लांबीहून आकाराने मोठे पंख असणाऱ्या या विमानाने कॅलिफोर्नियाच्या मोजेव्हा एअर अँड स्पेस पोर्टमधून सकाळी 6.58 वाजता (प्रशांत प्रमाणवेळ) उड्डाण केले.

कमाल 189 मैल (302.4 किलोमीटर) प्रतितासाचा वेग प्राप्त करत विमानाने मोजेव्ह वाळवंटात 17 हजार फूटाच्या उंचीवर 2.5 तासांपर्यंत उड्डाण केले आहे. मोठ्या विमानाला ऑर्बिटल-क्‍लास रॉकेटच्या उड्डाणासाठी लॉंचपॅडच्या स्वरुपात विकसित करण्याच्या उद्देशाने 2011 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक दिवंगत पॉल ऍलन यांनी स्ट्रेटोलॉंचची स्थापना केली होती. विमानांच्या पंखांचा फैलाव 385 फूटांइतका असून त्यांची लांबी 238 फूट इतकी आहे. जगातील कोणत्याही विमानाच्या तुलनेत हे विमान आकाराने मोठे असून याचे वजन 5 लाख पाउंड आहे.

नवा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या विमानाचे उड्डाण स्ट्रेटोलॉंच पथकासाठी एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. हा अंतराळाच्या टोकापर्यंत आणि त्याहीपुढे जाण्याशी संबंधित प्रयत्न असल्याचे उद्‌गार नासाचे पदाधिकारी थॉमस जुर्बुचेन यांनी केले. या विमानामुळे प्रवासी तसेच मालवाहतुकीची क्षमता वाढण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.