मुंबई – मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. गेल्या वर्षी आर्यन खान प्रकरणामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर चांगलेच चर्चेत आले होते. क्रांती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या लाईफचे अप अँड डाउन शेअर करत असते.
यावेळी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिने नुकताच नागपूर दौरा केला या दौऱ्यात तिने नागूपरचे फेमस सावजी मटणावर ताव मारला शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती सावजी मटणाचा आस्वाद घेताना दिसतेय. मात्र झणझणीत मटण खाताना तिची कशी अवस्था झाली हे व्हिडिओत सांगितलं आहे. क्रांतीच्या या व्हिडिओ नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
तिने व्हिडिओ शेअर करताना तिच्या नागपूर दौऱ्याबाबतचा अनुभव सांगितला. यावेळी तिने नागपुरातील रेशिमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली होती. तिथ त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली आणि हात जोडले. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिक्षाभूमी येथील अस्थिकलशाचे दर्शन घेत मध्यवर्ती स्मारकाची परिक्रमा केली आणि पुष्ण अर्पण करून अभिवादन केल.