योगी सरकारच्या काळात तब्बल 119 एन्काउंटर

74 प्रकरणांत पोलिसांना मिळाली क्‍लीन चिट

लखनौ – विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देशभरात चर्चेत आले आहेत. गुन्हे नोंदणी अहवालानुसार योगी सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजे सन 2017 पासून आजवर तब्ब्ल 118 एन्काउंटर करण्यात आले आहेत. यापैकी विकास दुबे हा 119 वा आरोपी आहे, ज्याचाही एन्काउंटर झाला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात झालेल्या या 119 एन्काउंटर प्रकरणातील 74 प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांना क्‍लीन चिट मिळाली आहे. तर 61 प्रकरणांमध्ये पोलिसांनी क्‍लोजर रिपोर्टही सादर केला आहे. या अहवालांना कोर्टानेही मंजुरी दिली आहे.

योगी सरकारच्या कार्यकाळात आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आजवर 6,145 मोहिमा राबवल्या. यापैकी 119 प्रकरणांमध्ये आरोपींचा म्‌ृत्यू झाला आहे तर 2258 आरोपी जखमी झाले आहेत. या मोहिमांमध्ये 13 पोलीसही शहीद झाले आहेत. यापैकी 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा गेल्या आठवड्यांत कानपूरमधील कारवाईदरम्यान शहीद झाले. तर 885 पोलीस जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.