मुंबई – आज बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः या मेळाव्याचे नेतृत्व करत असल्यामुळे याची जय्यत तयारी मैदानावर सुरु आहे. आलेल्या शिवसैनिकांच्या जेवणासह,मेळाव्यासाठी भव्य स्टेज आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. त्यासोबत बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक व्हॅनिटी व्हॅन देखील सज्ज करण्यात आल्याचे समजते.
मेळाव्यापूर्वी सज्ज होण्यासाठी तसेच काही व्हीआयपी व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी या व्हॅनिटी व्हॅनचा उपयोग एकनाथ शिंदे करणार असल्याचे समजते.
एसी असलेल्या या व्हॅनमध्ये बसण्यापासून ते स्वतःला पाहण्यासाठी गरज असलेल्या लाईट मिररची देखील सोया आहे.
आरामासाठी देखील या व्हॅनमध्ये छोट्या बेडची सोया आहे.
मेळाव्यापूर्वी सज्ज होण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा या व्हॅनमध्ये उपलब्ध असणार आहेत.