नवी दिल्ली : गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारताकडून पहिल्यांदाच मानवाला अंतराळात पाठविण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगीतले. डिसेंबर 2021 मध्ये होणाऱ्या या मोहीमेची सर्व तयारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अंतराळवीरांच्या भोजनाचीही खास यादी तयार करण्यात आली आहे.
For the Indian astronauts scheduled to go into Space in Mission Gaganyan, food items including Egg rolls, Veg rolls, Idli, Moong dal halwa and Veg pulav have been prepared by the Defence Food Research Laboratory, Mysore. Food heaters would also be provided to them. pic.twitter.com/gDgt9BJpb2
— ANI (@ANI) January 7, 2020
एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे. मैसूरमधील Defence Food Research Laboratory ने अंतराळवीरांसाठी खास जेवणाचा मेन्यू तयार केला आहे. यात एग रोल्स, व्हेजिटेबल रोल्स, इडली, सांबार, मुग डाळ हलवा, व्हेजिटेबल पुलाव या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. अन्नपदार्थ गरम करण्यासाठी फूड हिटरही अंतराळवीरांना पुरवण्यात येणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. 2022 मध्ये गगनयान मोहिम प्रत्यक्षात येणार आहे. के. सिवन म्हणाले, गगनयान मोहिमेसंदर्भात आम्ही 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे. मोहिमेचे अनेक डिझाईन्स तयार झाले आहेत. या मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या अंतराळवीरांना जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात प्रशिक्षणासाठी रशियाला पाठविण्यात येईल. इस्रोसाठी 2020 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. याच वर्षात चांद्रयान-3 मोहिम आखण्यात आली असून, त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.