रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईदरम्यान, एअर इंडियाचे विमान 182 भारतीय नागरिकांना घेऊन आज सकाळी दिल्लीला पोहोचले आहे. भारतातील युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
युक्रेनच्या संकटात अडकलेल्या भारतीयांची तातडीने सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ताज्या माहितीनुसार, आणखी 182 भारतीय नागरिकांसह एअर इंडियाचे विमान आज सकाळी दिल्लीला पोहोचले आहे. भारतातील युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स (यूआयए) चे विशेष विमान विद्यार्थ्यांसह 182 भारतीय नागरिकांसह आज सकाळी 7:45 वाजता दिल्ली विमानतळावर उतरले आहे.
युक्रेनमधून परतलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी दिल्ली विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते. यामधीरल एका विद्यार्थ्याने सांगितले की, काल रात्री आम्हाला युक्रेनमध्ये 30 दिवसांच्या आणीबाणीच्या स्थितीबद्दल संदेश मिळाला, म्हणून आम्ही घरी परतलो.
त्याचवेळी आणखी एका विद्यार्थ्याने सांगितले की मी सध्या जिथे राहत होतो तिथे परिस्थिती ठीक आहे कारण हे ठिकाण सीमेपासून खूप दूर आहे. पण आमच्या दूतावासाने आम्हाला जाण्यास सांगितले, अॅडव्हायजरी जारी झाल्यानंतर आम्ही परत आलो.