“दाटून कंठ येतो…”! लग्नानंतर मुलीची पाठवणी करताना संजय राऊतांना अश्रू अनावर

मुंबई : भारतीय राजकारणामध्ये सध्या आक्रमक वक्ता म्हणून ओळख असणारे शिवसेनेचे खासदार यांच्या मुलीचा काल विवाह सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, एरवी खंबीरपणे सर्वच परिस्थिती हाताळणारे संजय राऊत मुलीची पाठवणी करताना चांगलेच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाहसोहळा सोमवारी मुंबईमध्ये पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे पूर्वशी यांच्यासोबत  लग्नबंधनात अडकले. दरम्यान, या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत असतानाच राऊत यांची बाप म्हणून हळवी बाजू दाखवणारा मुलीची पाठवणी करतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

राऊतांच्या मुलीचे लग्न  थाटामाटात आणि दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये झाले असले तरीअगदी सर्वसामान्य घरात ज्या प्रमाणे मुलीची पाठवणी करताना वातावरण भावनिक होते तसेच चित्र पूर्वशी यांच्या लग्नानंतर दिसून आलं. मुलीच्या संगीत कार्यक्रमात नाचलेले राऊत मुलीला सासरी पाठवताना अत्यंत हळवे झाल्याचे पाहायला मिळाले. राजकारणात कितीही कणखर असले तर राऊतांमधील हा ‘मवाळ बाप’ काल अख्या महाराष्ट्राला पाहायला मिळाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.