दिवसभरातील एक गाणे विस्मरणावर रामबाण

वॉशिंग्टन –  अमेरिकेतील एका संशोधनाप्रमाणे दिवसभरात केवळ एक गाणे गायले तर त्याचा विसमरणाच्या आजारावर सकारात्मक परिणाम होतो विस्मरण किंवा स्मृतिभ्रंश या विकाराने त्रस्त असलेल्या लोकांनी आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसह गाणे गायले तर त्यामुळे आजारी व्यक्तीच्या मनातील सकारात्मक भावना वाढीस लागते अमी त्याचा परिणाम त्यांचा आजार कमी होण्यावर होतो.

न्यूयॉर्क अकेडमी ऑफ सायन्स या नियतकालिकात याबाबत संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे अशा प्रकारच्या आजाराने पीडित व्यक्तीस कौटुंबिक अक्षर आणि पाठिंबा याची गरज असते संगीताच्या मध्यमरून त्याला असा आधार आपल्याला मिळत असल्याची भावना निर्माण होते संगीतामुळे ज्या सकारात्मक भावना निर्माण होतात.

त्या मेंदूतील स्मृतीशी संबंधित प्रक्रियेशी थेट निगडित असतात त्यामुळेच अशा व्यक्तीवर इतर उपचार सुरु असताना त्यांला संगीताचा आनंद घेऊ द्यावा असे या संशोधनात म्हटले आहे
दररोज नृत्याच्या एखाद्या प्रकारचा आनंद घेणे किंवा अनवाणी पायाने काहीकाळ चालणे यामुळेही विसमरणाचा सामना करणाऱ्या व्यक्तीच्या वर्तणुकीवर सकारात्मक फरक पडू शकतो असेही या संशोधनात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.