– शिवशंकर निरगुडे
हिंगोली (प्रतिनिधी) – शेतकरी पुत्राने मोठ्या जिद्दीने MPSC परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. त्याच्या या यशामागे शेतकरी आई-वडिलांचा खारीचा वाटा आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने MPSC गाजवल्याने सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. जिद्द आणि चिकाटी असली की माणूस आपले ध्येय नक्कीच गाठतो. हे पुन्हा एकदा सिध्द करून दाखवले आहे, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर गावातील अमर रामेश्वर पायघन यांनी MPSC परीक्षेत यश संपादन करून दाखवले त्याच्या या यशा बद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील शेतकरी रामेश्वर शंकर पायघन व त्याचे भाऊ प्रकाश शंकर पायघन या दोन्ही भावांना 40 एकर शेती आहे आणि विशेष म्हणजे हें सर्व कुटुंब एकत्र राहतात यात रामेश्वर पायघन यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत एका मुलीचे लग्न झाले आहे. आणि आत्ता एक मुलगा RTO इन्स्पेक्टर झाला आहे आणि दुसरा मुलगा BAMS करत आहे.
आणि त्याच्या भावला प्रकाश शंकर पायघन यांना दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे दोन मुलीचे लग्न झाले आहेत व त्याच्या एक मुलगा BAMS करत आहे. दोन्ही भावांचे कुटुंब एकत्र राहून शेतात कष्ट करतात आणि आपल्या सर्व मुलांना चांगले शिक्षण देखिल देत आहेत. आत्ता त्याच्या या कुटुंबातील एक मुलगा RTO इन्स्पेक्टर झाल्यमुळे त्याच्या कुटुंबाचे जिल्ह्याभरातून कौतुक केले जात आहे.
सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक परिक्षा 2020 अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी अमर रामेश्वर पायघन (मुळ प्रवर्ग OBC) (गुणवत्ता यादी क्र. 45) यांना OBC -4 या प्रवर्गातून एस- 1438600-122800 वेतनश्रेणीत, परिविक्षाधीन सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक (गट-क) म्हणून, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे कार्यालय, नांदेड येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
अमर पायघन यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मुळ गाव जयपूर येथे 1 पाहिले ते 8 पर्यन्त झाले आहे वा नंतर चे 10 वि 12 वि रिसोड येथे त्याचे शिक्षण झाले व नंतर त्यांनी पूणे येथे MPSC तयारी चालू केली व 2020 मध्ये त्यांनी MPSC परीक्षा दिली त्या परीक्षेत त्याला यश मिळाले आत्ता त्याची नांदेड येथे RTO इन्स्पेक्टर पदी ऑडर आली आहे.
आणि उद्या तो दिवटी जॉईन करणार आहे. मार्च 2020 प्राथमिक परीक्षा नोव्हेंबर 2021मध्ये मुख्य परीक्षा 22 मार्च 2022 मुख्य परीक्षेचा निकाल त्यातच नंतर कोर्ट केस खेचर जॉईन 8 माहिने लांबली व कोरोना व त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे प्राथमिक परीक्षेचा निकाल तब्बलदिड वर्षानी लागला यात अमर पायघन यांचे सलेक्शन झाले आहे.