हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथील अक्षय विठ्ठल गायकवाड यांची आर एफ ओ रेंज फाॅरेस्ट ऑफिसर पदी निवड करण्यात आली आहे. यानिमित्त अक्षय गायकवाडच्या आई- वडीलांचा गावकऱ्यांच्यावतिने सत्कार करण्यात आला. अक्षयने या पदावर पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली त्याच्या या मेहनतीचे सर्वांकडून कौतुक होताना दिसत आहे.
अक्षयच्या या यशामागे शेतकरी आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. अक्षयचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाताडा खुर्द ता सेनगाव येथे झाले तसेच सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण माध्यमिक शाळा -जवाहर नवोदय विद्यालय वसमत नगर हिंगोली येथे झाले. त्यानंतरचे पदवीधर शिक्षण – वनविद्या महाविद्यालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे झाले.
पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अक्षयने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणारी वन सेवा परीक्षा पास होऊन आर एफ ओ रेंज फाॅरेस्ट ऑफिसर पोस्ट मिळवली. आई वडिलांनी काढलेल्या कर्जाची जाणीव ठेवत अक्षयने त्यांच्या कष्टाचे चीज केले.
मुलाच्या शिक्षणासाठी केली मेहनत
शिक्षणासाठी शेत व घर विकावे लागले तरी चालेल पण प्रयत्न सोडायचे नाहीत, अशा शब्दात वडिलांनी त्याला धिर दिला तर आईने शिक्षणासाठी गटातून पैसे उभे करत दळणाची चक्की घेतली त्यातून कष्ट करत एक एक रूपया मूलाच्या शिक्षणाला गोळा केला. इतकंच नाहीतर दोघांनी मुलाच्या स्पर्धा परीक्षा शिकवणीकरिता कर्जही काढले
अक्षयने देखील आपल्या आई वडिलांच्या मेहनीतीची जाणीव ठेवत उत्तम अभ्यास केला आणि घवघवीत यश मिळवले.अक्षयने ऑफिसर होताच संपूर्ण जिल्ह्यातून त्याचे कौतुक होत आहे. तसेच अक्षयच्या आई- वडीलांचा गट विकास अधिकारी व्हि एस गोरे,माधव कोकाटे, गजानन क्षिरसागर, ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.