जेलमधील कमाईमधून ऑनलाईन शिक्षणासाठी मुलीला दिला स्मार्टफोन

डॉक्टर होण्याची इच्छा बाळगणाऱ्या यामिनीचा शिक्षणाचा मार्ग खुला

Madhuvan

अंबिकापुर/छत्तीसगड – एका खुनाच्या आरोपाखाली अनेक वर्षे जेलमध्ये कारावासाची शिक्षा भोगलेल्या एका पित्याने या कालावधीमध्ये कमावलेल्या पैशातून आपल्या मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी गरजेचा  स्मार्ट फोन घेऊन दिल्याची घटना घडली आहे. 

छत्तीसगडमधील अंबिकापूर येथील ही घटना आहे आनंद नागेश या नावाच्या  पित्याची  कन्या यामिनी सध्या बारावीमध्ये शिकत आहे. पंधरा वर्षाचा कारावास भोगून आनंद जेव्हा घरी परत आला तेव्हा त्याच्या लक्षात ही गोष्ट आली की ऑनलाईन शिक्षणासाठी आपल्या मुलीकडे स्मार्टफोन नाही स्मार्ट फोन घेण्यासाठी तिच्याकडे पैसेही नव्हते  ही गोष्ट लक्षात येताच आनंदने गेल्या काही वर्षांमध्ये जेलमध्ये सश्रम कारावासाची शिक्षा भोगून कमावलेल्या पैशाचा वापर करून आपल्या मुलीला स्मार्ट फोन घेऊन दिला.

आनंदची मुलगी यामिनीला डॉक्टर व्हायचे आहे. यामिनी अभ्यासात हुशार आहे पण स्मार्टफोनअभावी ती ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घेऊ शकत नव्हती स्मार्टफोन घेण्यासारखी आर्थिक परिस्थितीही नव्हती आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या आड कोणतीही गोष्ट येऊ नये या एकाच हेतूने आनंदने कारावासात कमावलेल्या पैशाचा वापर करून आपल्या मुलीला स्मार्ट फोन घेऊन दिला. आणि तिच्या शिक्षणाचा मार्ग खुला केला. आनंद जरी खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होता तरी कारावासतील त्याचे वर्तन अतिशय चांगले होते अशी माहिती तुरुंग अधिकार्यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.