तापमानात किंचित घट; पण उकाडा कायम

पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांपासून असणारी उष्णतेची लाट अद्याप कायम आहे. पुण्यात ही आज कमाल तापमानात किंचित घट झाली असली तरी उकाडा मात्र कायम होता.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा वाढलेला आहे. तो आजही कायम होता. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस सुद्धा पडला असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

पुण्यात ही आज तापमानाच पारा किंचित घटला होता. आज शहरातील तापमान 39.9 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. काही दिवसांपासून पुण्यातील तापमान सुद्धा चाळिच्यावर गेले होते. त्यात थोडी घट झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आगामी काळात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुण्यातही तापमानाचा पारा 40 अंशाच्या आसपास राहणार आहे.

पावसाचा अंदाज
उन्हामुळे होरपळ होत असतानाच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान चाळिशी पार गेल्याने, उन्हाचा ताप असह्य होत आहे. सायंकाळनंतर होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे कोकणातील सिंधुदूर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील लातूर आणि परिसरात उद्या (ता.24 ) वादळी पावसाचा अंदाज हवामान आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.