मुंबई – महानायक ‘अमिताभ बच्चन’ होस्ट करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) हा रिअॅलिटी शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये बिग बींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सोनी वाहिनी आणि बच्चन यांना धारेवर धरले आहे.
गुजरातच्या शाहेदा चंद्रन या केबीसीच्या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले होते.
1. महाराणा प्रताप
2. राणा सांगा
3. महाराजा रणजीत सिंह
4. शिवाजी
@SrBachchan
@SonyTV
We want apology for your disrespectful behavior while showing name of Chatrapati Shivaji Maharaj in options from episode of Kaun Banega Crorepati….This is not tolerable. Please do respect icons.#Apology #KBC11 #shivajimaharaj pic.twitter.com/g5owsms8qv— Arjun Pawar (@arjun_pawar) November 7, 2019
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याने नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
Need apology from you on TV channel for not using Chatrapati Shivaji Maharaj name properly in yesterday’s episode. This is disgusting from KBC & insulting @SonyTV @KBCsony @SrBachchan @BJP4Maharashtra @NCPspeaks @mnsadhikrut @ShivSena @INCMaharashtra #म #मराठी @shyvijay pic.twitter.com/OQ9R7JP8O2
— Sayaji#bhajaphatwa (@Sayaji06192130) November 7, 2019