पथसंचलनातून पोलिसांकडून शक्तीप्रदर्शन

पाथर्डी – केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान व पाथर्डी पोलीस यांनी आगामी मोहरम, गणेशोत्सव या सणाच्या पार्श्वभुमीवर पाथर्डी शहरातून पथसंचलन करून पोलीस दलाचे शक्तीप्रदर्शन केले.
शहर व तालुक्यात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायदे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर,श्रीकांत डांगे, गुप्तवार्तहाचे पोलिस कॉन्स्टेबल भगवान सानप हे या पथकात सहभागी झाले होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांचे विशेष पथक पाथर्डी शहरात दाखल होऊन प्रमुख रस्त्यावरून पथसंचालन करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले गेले.शहरातील मुख्य नाईक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवीपेठ, क्रांती चौक, अजंठा चौक, मेनरोड आदी भागातील रस्त्यांवर पोलिसांनी पथ संचलन केले. या संचलनामध्ये पोलीस अधिकारी अलोककुमार झा यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शीघ्र कृती दलाचे 70 महिला व पुरुष जवान सहभागी झाले होते. केंद्रीय पोलीस बल पाथर्डी शहरात दाखल होतात त्यांचे माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर मित्र मंडळाकडून स्वागत करून या पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज असून कायद्याच्या राज्यात आपण सर्व नागरिक आहोत, याची जाणीव राहून कायद्याचा कोणी भंग करु नये. लोकांनी कायद्यावर विश्वास ठेवावा. त्यासाठीचा हा पथसंचलन आहे. येणारे सर्व सण उत्सव शांततेत पार पाडून पोलीस दलाला सहकार्य करावे.
– संतोष मुटकुळे,
पोलीस निरीक्षक,





