काळजाचा थरकाप उडवणारी घटना ! सात महिन्याच्या गर्भवती पत्नीला ‘त्याने’ १ हजार फूट खोल दरीत दिले ढकलून

पत्नीला मारण्यामागचे खरे कारण आले समोर

मुगला : तुर्कीमध्ये एका पतीने आपल्या गर्भवती पत्नीसोबत जे केलं ते वाचून तुमच्याही काळजाचा थरकाप उडणार आहे. आपल्या पत्नीसोबत सुंदर बटरफ्लाय व्हॅलीमध्ये त्याने अनेक तास घालवले. आणि त्यानंतर १ हजार फूट उंचीवरून तिला धक्का देऊन मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार ही घटना जून २०१८ मधील आहे. या प्रकरणावर अजूनही पोलीस तपास करत आहे. दक्षिण-पूर्व तुर्कीचे शहर मुगला येथे राहणारा ४० वर्षीय हाकान आयसाल पत्नी सेमरा आयसालसोबत बटरफ्लाय व्हॅलीला फिरायला गेला होता. यावेळी त्यांनी डोंगरावर फोटोही काढले. आरोपी आहे की, सेल्फी घेतल्यानंतर हाकानने पत्नी सेमराला १ हजार फूट उंचीवरून धक्का दिला आणि ती खाली पडली. सेमराचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. हाकानला यानंतर अटक करण्यात आली. पतीने केलेल्या या कृत्यामागील कारण समोर येत आहे.

हाकानने काही दिवसांपूर्वी पत्नीच्या नावाने एक विमा काढला होता. विम्याचा हाकान हा एकमेव नॉमिनी आहे. विम्याच्या नियमांनुसार जर सेमराचा एखाद्या दुर्घटनेत आकस्मिक मृत्यू झाला तर नॉमिनीला ४० हजार लीराचा क्लेम मिळेल. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. वकिलांनी दावा केला की, हाकान तीन तास टेकडीवर यासाठी बसून राहिला की, आजूबाजूला कुणी नाही ना हे बघू शकेल. जशी त्याला संधी मिळाली त्याने सेमराला १ हजार फूट उंचीवरून खाली ढकलले. यानंतर या निर्दयी पतीने ४० हजार लीरा म्हणजे साधारण ४० लाख रूपयांचा क्लेम केला. पण तपासादरम्यान तो रद्द करण्यात आला.

तुर्कीच्या स्थानिक कोर्टाने हाकानला तुरूंगात टाकण्याचा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे मृत महिलेच्या कुटुंबियांनी खुलासा केला आहे की, समेराच्या पतीने तिच्या नावाने तीन लोनही घेतले होते. कदाचित ते हडपण्यासाठीच त्याने तिची हत्या केली. कुटुंबियांनी सांगितले की, सेमराला उंचीची भीती वाटत होती. तरी मुद्दामहून तो तिला १ हजार फूट उंच डोंगरावर घेऊन गेला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.