भातपारा (पश्चिम बंगाल) – पश्चिम बंगालमध्ये लोहमार्गाजवळ झालेल्या एका बॉम्बस्फोटात 7 वर्षांचा एक मुलगा मरण पावला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
पश्चिम बंगालमधील नॉर्त 24 परगणा जिल्ह्यात काकिनारा आणि जगदल रेल्वे स्तानकांदरम्यानच्या लोहमार्गाजवळ सकाळी साडे 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही मुले लोहमार्गाजवळ पडलेल्या संशयास्पद पॅकेटशी खेळत होती. तेंव्हा या पॅकेटचा स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले. एक मुलगा मरण पावला, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखीन एक महिला या स्फोटामुले जखमी झाली असून तिच्या जिवाला आता धोका नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळी आणखीन एक जिवंत बॉम्ब सापडला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.