कोलसीब (मिझोराम) कोरोनाची साथ पसरल्याने गरिबांचे हाल होत असल्याचे पाहून मिझोराममधील अवघ्या सात वर्षांच्या चिमुरड्याने आपली पिगी बँक फोडून आपली बचत कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी दिली. त्याच्या या कृतीचे कौतुक देशभरातून होत आहे.
रोमेल लालमुणसंग असे त्या चिमुरड्याने नाव आहे. त्याने ग्राममंडळाकडे बचतीतील ३३३ रुपयांची चिल्लर सोपवली. . त्याच्या या कृत्याची दखल मुख्यमंत्री झोरमथांग यांनी घेतली.
त्यांनी ट्विटवरवर या लहानग्यांचे कौतुक केले. तूच खरा हिरो आहेस असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.