गुजरातेत आणखी एक धक्का : रुपाणी मंत्रिमंडळातील सर्वांना नारळ!

गांधीनगर – विधानसभा निवडणुकांना अवघे एक वर्ष उरले असताना गुजरातमधील भाजप सरकारमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. मुख्यमंत्री रुपाणी यांचा राजीनामा, त्यांच्याजागी फर्स्ट टर्म आमदार भूपेंद्र पटेल यांना संधी, ही धक्क्यांची मालिका आज झालेल्या नव्या मंत्र्यांच्या  शपथविधीमध्ये देखील कायम राहिली. पटेल यांच्या नव्या मंत्रिमंडळात आज १० मंत्री व १४ राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

आश्चर्याची बाब म्हणजे पटेल यांच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे, मुख्यमंत्री रुपाणी यांच्यापाठोपाठ  त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या सर्वांना नारळ मिळाला आहे. मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही देखील समावेश आहे.

गुजरातेतील नव्या मंत्रिमंडळातील नावांबाबत स्वतः रुपाणी व नितीन पटेल नाराज असल्याचं वृत्त तेथील माध्यमांनी दिलं होत. यामुळेच बुधवारी होणार शपथविधी सोहळा एक दिवस पुढे ढकलावा लागला. मात्र आजच्या शपथविधी सोहळ्यात नाराजांना थेट नारळ मिळाल्याचे पाहायला मिळाले.

नवनियुक्त १० मंत्री व १४ राज्यमंत्री 

मंत्री 

 1. राजेंद्र त्रिवेदी
 2. जितेंद्र वघानी
 3. ऋषिकेश पटेल
 4. पूर्णश कुमार मोदी
 5. राघव पटेल
 6. उदय सिंह चव्हाण
 7. मोहनलाल देसाई
 8. किरीट राणा
 9. गणेश पटेल
 10. प्रदीप परमार

राज्यमंत्री 

 1. हर्ष सांघवी
 2. जगदीश ईश्वर
 3. बृजेश मेरजा
 4. जीतू चौधरी
 5. मनीषा वकील
 6. मुकेश पटेल
 7. निमिषा बेन
 8. अरविंद रैयाणी
 9. कुबेर ढिंडोर
 10. कीर्ति वाघेला
 11. गजेंद्र सिंह परमार
 12. राघव मकवाणा
 13. विनोद मरोडिया
 14. देवा भाई मालव

नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज (गुरुवार) दुपारी ४.३० वाजता गांधीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.