सलमान खानच्या बहुचर्चित ‘तेरे नाम’चा येणार सिक्वल

अभिनेता सलमान खानचा 2003 मध्ये प्रदर्शित झालेला “तेरे नाम’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमानने राधेची भूमिका साकारली होती, जी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटाच्या सिक्वलची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

याबाबत अलीकडेच दिग्दर्शक सतीश कौशिकने सांगितले की, “तेरे नाम’ची कथा पुढे आणण्यासाठी तीन ते चार आयडिया आहेत. यातील काही कल्पनांचा मी पाठपुरावा सुरू केला आहे; परंतु अद्याप सलमानशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सतीश कौशिक म्हणाले, जुन्या चित्रपटातील राधे मोहनच्या भूमिकेच्या पैलूंवर अनेक प्रकारे चित्रपटाचा सिक्‍वल बनविता येऊ शकतो. या सिक्‍वलची योजना पुढे सुरू राहिल्यास, जिथे जुनी कथा संपली त्याच्या पुढे सुरू करण्यात येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दरम्यान, “तेरे नाम’ हा एक तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. त्याचे हक्क राम गोपाल वर्मा यांनी विकत घेतले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी दुसऱ्याने करायचे होते. त्यावेळी चित्रपटाचा नायक संजय कपूर होता. मात्र, यात अनेक बदल झाल्यानंतर सलमान खानने मुख्य भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.