अभिषेक बच्चनच्या “मनमर्जियां’चा येणार सिक्‍वल

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनसाठी 2020 हे वर्ष आतापर्यत खूपच शानदार ठरले आहे. अभिषेक बच्चनने “ब्रीद ः इनटू द शॅडोज’ या वेबसिरीजमधून यशस्वीपणे डिजीटल डेब्यू केले आहे. तसेच त्याचे “लुडो’ आणि “द बिग बुल’ हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. हे दोन्ही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. अभिषेक बच्चन लवकरच आणखी एक बिग बजेट चित्रपट करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

हा चित्रपट त्याच्या सुपरहिट ठरलेल्या “मनमर्जिया’चा सिक्‍वल आहे. या चित्रपटात अभिषेक, तापसी पन्नू यांनी मुख्य भूमिका साकारली होती. दिग्दर्शक अनुराग कश्‍यप हे पुन्हा एकदा तापसी पन्नू, विक्‍की कौशल आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत “मनमर्जिया’चा सिक्‍वल साकारण्याचे प्लॅनिंग करत आहेत. “मनमर्जिया’मधील अभिषेक बच्चनने साकारलेली भूमिका खूपच गाजली होती. यातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. दरम्यान, अनुराग कश्‍यपशिवाय अभिषेक बच्चन हा चित्रपटनिर्माता मणिरत्नमसोबत आणखी एका चित्रपटाची तयारी करत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.