वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केडर हवे; निवासी डॉक्‍टरांची पंतप्रधानांकडे मागणी

 

नवी दिल्ली- प्रशासनातील आयएएस, आयपीएस केडर प्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठीही स्वतंत्र केडर स्थापन करावे अशी मागणी निवासी डॉक्‍टरांच्या महासंघाने पंतप्रधानांना पत्र पाठवून केली आहे. करोना रोगाच्या प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर देशातील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा तळागाळापासून सुधारण्याची गरज प्रकर्षाने समोर आली आहे त्याकडेही सरकारने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशासनात इंडियन मेडिकल सर्व्हिस नावाचे स्वतंत्र केडर निर्माण करण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे. हे केडर स्वतंत्रपणे अस्तित्वात आले तर ते करोनासारख्या महामारीच्या काळात अधिक प्रभावीपणे काम करू शकेल, देशातील वैद्यकीय स्थिती सुधारण्याच्या कामात हे स्वतंत्र वैद्यकीय केडर प्रभावीपणे आपली भूमिका निभाऊ शकेल असेही त्यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.