आयसीएमआरच्या एका वरिष्ठ वैज्ञानिकाला करोनाची लागण

नवी दिल्ली – देशभरात करोना बाधितांचे रुग्ण वाढतच आहेत. अशातच भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर)एका वरिष्ठ वैज्ञानिकाला करोना झाल्याची माहिती समजते आहे.

माहितीनीसार, आयसीएमआरच्या एका वरिष्ठ वैज्ञानिकाला करोनाची लागण झाली आहे. यानंतर आयसीएमआरची संपूर्ण इमारत सॅनिटाईज करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील वैज्ञानिक दिल्ली येथे आले होते. आणि रविवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 8392 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. याशिवाय एका दिवसात 230 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या 1,90,535 वर पोहोचली आहे. एकूण मृत्यू 5394 आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 91,819 लोकांना डिस्चार्ज देण्यात आल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.