मुंबई : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे पूत्र रणजितसिंग यांना पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील घोटाळा प्रकरणी अटक केल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यंच्या निवासस्थानाची झडती घेतली. दरम्यान, तत्पुर्वी त्यांना न्यायलयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना 35 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले.
रणजितसिंग यांना न्यायलयात हजर करून झाल्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या चार अधिकारी आणि पथकाने त्यांच्या सायन कोळीवाडा येथील कर्मक्षेत्र इमारतीतीतील त्याच्या निवासस्थानाची झडती घेतली. तेथे सुमारे तासभर हे शोधकार्य सुरू होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना घराबाहेर थांबण्यास सांगण्यात आले होते, असे पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले. मात्र त्या तेथून काय ताब्यात घेतले अथवा जप्त केले याची माहिती देण्यास या अधिकाऱ्यांनी नकार दिला.
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या यामुळे नऊवर पोहोचली आहे. हा चार हजार 355 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. अन्य आरोपींमध्ये बॅंकेचे तीन अती वरीष्ठ अधिकारी आणि एचडीआयएलचे दोन प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवाना यांचा समावेश आहे.
बॅंकेचे माजी संचालक असणारे रणजीतसिंग हे बॅंकेच्या कर्जवसुली समितीवरही होते. एचडीआयएल आणि आरोपींपैकी काहींचा संबंध असावा. त्यामुळे एचडीआयएलकडून कर्ज थकल्याने बॅंक डबघाईला आली आणि रिझर्व्ह बॅंकेला त्यावर प्रशासक नेमावा लागला. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले, असा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला संशय आहे. एचडीआयएल आणि आरोपीं मधील कथित संबंध प्रथम दर्शनी उघड झाले आहेत. मात्र त्यात व्यापक कट असावा, असा संशय घेण्यास वाव असल्याच्या पोलिसांनी न्यायलयात सांगितले आहे.