नवी दिल्ली : देसी उसैन बोल्ट अशी ओळख असलेल्या श्रीनिवास गौडा यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी तीन लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. क्रीडामंत्र्यांच्या सूचनेनंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारीही मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले होते, पण त्यांच्यासोबत जाण्यास श्रीनिवास गौडा यांनी नकार दिला.
धावपटू श्रीनिवास गौडाने 142.5 मीटरची धाव 13.62 सेकंदात पूर्ण केली होती. त्यांनी जागतिक विक्रम करणाऱ्या उसैन बोल्टचा रेकॉर्ड .03 सेकंदाने तोडला होता. त्यानंतर सोशल मीडियामध्ये श्रीनिवास गौडा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटमुळे या ‘व्हिडिओ’ला प्रेक्षकांची अधिकच पसंती मिळाली होती.
त्यानंतर क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी श्रीनिवास गौडा प्रशिक्षण देतील असे ट्विट केले होते.