एसपींनी घेतला कराड पोलीस ठाण्यांचा आढावा

कराड – पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी प्रथमच कराड शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन शहर आणि तालुका पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा सोमवारी सायंकाळी आढावा घेतला. यावेळी पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, परिविक्षाधीन उपअधीक्षक मिलींद शिंदे, शहर पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, तालुका पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, सपोनि जोतिराम पाटील, वाहतूक शाखेचे सपोनि संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक भारत चंदनशिव उपस्थित होते.

एस.पी. सातपुते यांनी शेणोली दरोड्याच्या तपासासह शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच शहर पोलीस ठाण्यातील सर्व शाखांची पाहणी केली. गुन्हे प्रकटीकरण शाखा, मुद्देमाल कारकून कक्ष, क्राईम, या कक्षांमध्ये जाऊन कामकाजाचा आढावा घेतला. उपअधीक्षक ढवळे, शिंदे, पो. नि. गायकवाड, क्षीरसागर यांनी श्रीमती सातपुते यांचे बुके देऊन स्वागत केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)