प्राधिकरणात उद्या पालकमंत्र्यांची आढावा बैठक 

पीएमआरडीए, प्राधिकरणच्या प्रकल्पांबाबत चर्चा

पिंपरी –
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी (दि. 5) सकाळी 10 वाजता बैठक घेणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या प्रकल्पांचा आढावा दोन स्वतंत्र बैठकांमध्ये घेण्यात येणार आहे.
सुरुवातीला पीएमआरडीएच्या बैठकीत पीएमआरडीएतर्फे सुरू असलेले प्रकल्प आणि भविष्यातील नियोजित प्रकल्पांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर, प्राधिकरणाची आढावा बैठक होईल.

त्यामध्ये प्रामुख्याने वाल्हेकरवाडी गृहप्रकल्प, पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्प, मोशी येथील खुल्या प्रदर्शन केंद्राचे सुरू असलेले काम, पेठ क्रमांक सहामधील नियोजित गृहप्रकल्प आदींबाबत चर्चा होईल. तसेच, पेठ क्रमांक 12 मधील मोकळ्या जागेत विकसित करण्यात येणारे उद्यान, क्रीडांगण, क्‍लब हाऊस व अन्य विकासकामांबाबत या बैठकीत माहिती दिली जाणार आहे. पाटील यांची प्राधिकरणात कार्यालयात ही पहिलीच बैठक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.