घरगुती गणपतीसाठी साकारली ‘श्रीराम मंदिरा’ची प्रतिकृती

पिंपरी – पिंपळे सौदागर येथे घरगुती गणपतीसाठी अयोध्या येथील प्रस्तावित श्रीराम मंदिराची आकर्षक प्रतिकृती बनविण्यात आली आहे. हार्ड फोमपासून बनविलेली ही प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने होत आहे. घरगुती गणपतींना मात्र काही भाविक आकर्षक सजावट करत आहेत. पिंपळे सौदागर येथील पार्क रॉयल सोसायटीत अर्चना सोनिगरा यांच्या घरी बसविलेल्या गणपतीसाठी श्रीराम मंदिराची ही आकर्षक प्रतिकृती बनविण्यात आली. संबंधित प्रतिकृती बनविण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी लागला.

प्रतिकृतीमध्ये मंदिराचे 21 छोटे-मोठे कळस आहेत. तसेच, मंदिराच्या बनविलेल्या आकर्षक डिझाईनमुळे ही प्रतिकृती लक्षवेधक ठरत आहे. 1 मीटर उंची आणि 1.25 मीटर लांबीची ही प्रतिकृती आहे. अर्चना सोनिगरा, सोहम सोनिगरा, शुभम सोनिगरा यांनी ही प्रतिकृती बनविली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.