लाल रंगाची साडी, माथ्यावर लालभडक कुंकू; कोण आहे हा अभिनेता?

मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट तमिळ कॉमेडी भयपट ‘कंचना’चा रिमेक असणार आहे. चित्रपटात अक्षय प्रेक्षकांना एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर अक्षयने आपल्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटातील व्यक्तिरेखेचा लूक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये अक्षयने लाल रंगाची साडी नेसलेली असून, माथ्यावर लालभडक कुंकू, गळ्यात तावीज असा त्याचा अवतार धारण केला आहे. त्याच्या मागे देवीची भव्य मूर्ती देखील दाखविण्यात आली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’चे पोस्टर शेअर करताना अक्षयने नवरात्रीचा अर्थही सांगितला आहे.

राघवा लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून 5 जून 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल महिन्यातच सुरु झाले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.