तिरुपती मंदिरात एका दिवसात विक्रमी 6.28 कोटीचे दान! 

हैद्राबाद: येथील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात गुरुवारी विक्रमी 6.28 कोटी रुपयांचे दान देण्यात आले आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या इतिहासात एका दिवसातील हे विक्रमी दान आहे. या पूर्वी एक दिवसात जास्तीत जास्त 5.73 कोटी रुपयांचे दान देण्यात आले होते.
सन 2012 मध्ये हे 5.73 कोटी रुपयांचे दान देण्यात आले होते. सन 2012 मध्ये तिरुपती बालाजी मंदिरात वर्षभरात 859 रुपयांचे दान मिळाले होते. 2013 मध्ये दानाची रक्कम 832 कोटी रुपये इतकी होती.
या पूर्वी 2012 मध्ये रामनवमीच्या दिवशी 5.63 कोटी रुपयांचे दान बालाजी मंदिरात देण्यात आले होते. तर काल गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी सर्वाधिक 6,23 कोटी रुपये मंदिराच्या दानपेटीत आणि अन्य प्रकारे पडले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)